Health ID Card Registration Maharashtra 2021: एक देश, एक रेशन कार्ड, एक देश एक कर या योजना नंतर आता एक देश, एक आरोग्य कार्डसाठी केंद्र सरकारने Health ID Card सुरू केले आहे. केंद्र सरकार 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन देशभरात लाँच केले आहे. अगोदर याची चाचणी अंदमान-निकोबार, चंडीगड, दादरा आणि नगर-हवेली या ठिकाणी सुरू होती.
नागरिकांना आरोग्य सुविधा देणं हे नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनचे उद्दीष्ट आहे. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा रेकॉर्ड, देशभरातील खासगी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची माहिती पोहोचवली जाणार. या लेखामध्ये आपण हेल्थ कार्ड बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Health ID Card information in Marathi
जन धन, आधार आणि मोबाईल (जेएएम) आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे रचलेल्या पायावर आधारित, पीएम-डीएचएम व्यापक डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या तरतुदीद्वारे एक वेगवान ऑनलाइन मंच तयार करेल आणि आरोग्य-संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि खासगीपणा सुनिश्चित करताना खुल्या, आंतर परिचालन , मानकांवर आधारित डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करेल. मिशन त्यांच्या संमतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि देवाणघेवाण सक्षम करेल.
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना नवीन अर्ज सुरू | अटी व शर्ती कोण असेल पात्र
पीएम-डीएचएमच्या मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा समावेश आहे जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्याच्याशी वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं मदतीने पाहिल्या जाऊ शकतात. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.
हेल्थ आयडी कार्ड म्हणजे काय?
- आपण सर्वच जण तपासणीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जातो.
- तज्ज्ञ त्या संदर्भातील एक फाइल तयार करतात. त्यात आपला सर्व वैद्यकीय इतिहास असतो.
- हेल्थ आयडी कार्ड म्हणजे याच फाइलचे डिजिटल स्वरूप असते.
- या फाइलला आधार का प्रमाणे १४ आकडी युनिक आयडी असेल.
- या आयडीवर तुमचा सर्व आरोग्य डेटा स्क्रीनवर दिसेल. हेल्थ आयडी क्रमांक सेंट्रल सर्व्हरशी जोडलेला असेल.
- नागरिकांना आरोग्य सुविधा देणे.
- यामध्ये नागरिकांचा आरोग्य संबंधित रेकॉर्ड राहिलं.
आपण एवढे जे पॉईंट बघितले यांच्याद्वारे आपल्याला समजलेले असेलच की Health ID Card म्हणजे काय आहे. ‘Health ID Card Maharashtra’
आपले हेल्थ आयडी कार्ड बनवण्यासाठी आपण आमच्या अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच श्री मल्टीसर्व्हिसेस केंद्रास भेट देऊ शकता.
आपचा संपर्क पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मेन मार्केट रोड, ग्रा.पं.गाळा नं ३, देवगांव (रं), ता.कन्नड जि.औरंगाबाद
संचालक : अमोल करडे ८१४९९६३७७७
असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा