MahaDBT Farmer News: 15 मे नंतर महाडीबीटी योजनांची सोडत यादी बंद होणार का? | पहा काय आहे सत्यता… – ASK SMART TIPS

MahaDBT Farmer News: 15 मे नंतर महाडीबीटी योजनांची सोडत यादी बंद होणार का? | पहा काय आहे सत्यता…

नमस्कार शेतकरी बांधवांना, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Farmer News) द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. या पोर्टल द्वारे अद्याप पर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे.

समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या संदेश बद्दल?

शेतकरी बांधवांनो मागील चार दिवसांपासून समाज माध्यमांवर (MahaDBT Farmer News)  महाडीबीटी योजना ची 15 मे नंतर सोडत होणार नसल्याबाबतचा संदेश प्रसारित झालेला आहे तर या बातमीबद्दल कृषी विभाग यांच्याशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की ही बातमी चुकीची असून अशा प्रकारचा कोणताही संदेश कृषी आयुक्तालय किंवा कृषी विभाग मार्फत देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे खालील बातमी ही खोटी असून शेतकरी बांधवांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.

तर शेतकरी बांधवांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर नियमितपणे अर्ज स्वीकारणे सुरू राहतील आणि शेतकरी योजनांची लॉटरी (MahaDBT Lottery) म्हणजेच सोडत यादी ही नियमितपणे काढण्यात येणार असल्याचे कृषि वियभगकडून सांगण्यात आले आहे. तर, वरील प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.