महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेची आठवी यादी ही जाहीर करण्यात आली आहे.या योजनेमध्ये २ लाखांपर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पूनर्गठीत पीक कर्ज माफ होत आहे.यासाठी आपल्याला कोठेही अर्ज करण्याची आश्यकता नाही.तसेच आपल्याला थकबाकी भरण्याची आवश्यकता नाही.
शेतकऱ्यांना कसा मिळेल लाभ.
३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेलं अल्प मुदत पीक कर्ज आणि पूनर्गठीत पीक कर्ज माफ होणार
पीक कर्जाची येणारी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात थेट भरण्यात येणार आहे.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार
सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
आपला आधार क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.
आपण स्वतः ऑनलाईन यादी पाहू शकत नाही.यासाठी आपल्याला जवळील आपले सरकार सेवा केंद्र,कॉमन सर्व्हिस सेंटर, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण यादी पाहू शकता. तसेच आपण याठिकाणी आधार प्रमाणीकरण सुद्धा करू शकता.
आपले यादी मधील नाव बघण्यासाठी आपण स्वतः ऑनलाईन यादी पाहू शकत नाही.यासाठी आपल्याला जवळील आपले सरकार सेवा केंद्र,कॉमन सर्व्हिस सेंटर, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण यादी पाहू शकता. व आपण आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपण आमच्या श्री मल्टिसर्विसेस केंद्रास भेट देऊ शकता.
पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मेन मार्केट रोड, ग्रा.पं.गाळा नं.३, देवगांव (रं), ता.कन्नड जि.औरंगाबाद
संपर्क क्र : 8149963777
💁 असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/I6uuXLGWRznLRKmwNurOYZ