प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना नवीन अर्ज सुरू | अटी व शर्ती कोण असेल पात्र | श्री मल्टीसर्व्हिसेस – ASK SMART TIPS

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना नवीन अर्ज सुरू | अटी व शर्ती कोण असेल पात्र | श्री मल्टीसर्व्हिसेस

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN) योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निदेशाप्रमाणे राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता प्रदान करण्यात आली. त्यास अनुसरून राज्य शासनाने दि. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना म्हणजेच शेतकरी कुटुंबाचे लागवडीलायक एकूण मालधारण क्षेत्र २ हेक्टर पर्यंत आहे. त्यांना या योजनेचा फायदा मिळत होता. तथापि केंद्र शासनाकडील दि. ७ जून २०१९ चे पत्रानुसार सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु.२०००/- प्रति हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रु. ६०००/- प्रति वर्षी लाभ सुरू झाला आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाही.

१) जमीनधारण करणारी संस्था.

२) संवैधानिक पदधारण करणारी / केलेली आजी / माजी व्यक्ती.

३) आजी / माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.

४) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी / कर्मचारी,शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी / कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/गट-ड वर्ग कर्मचारी वगळून).

५) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती.

६) निवृत्ती वेतनधारक व्यक्ती यांचे मासिक निवृत्ती वेतन रु.१०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थ श्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून).

७) नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरीता ऑनलाईन अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे.याकरिता आपल्याला कॉमन सर्व्हिस सेंटर ,महा ई सेवा केंद्र याठिकाणी जाऊन आपण अर्ज करू शकता.आपणं फक्त याच ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता.आपणं स्वतः ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही.

आपला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपण आमच्या अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच श्री मल्टीसर्व्हिसेस केंद्रास भेट देऊ शकता.

आपचा संपर्क पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मेन मार्केट रोड, ग्रा.पं.गाळा नं ३, देवगांव (रं), ता.कन्नड जि.औरंगाबाद

संचालक : अमोल करडे ८१४९९६३७७७

Pm kisan gov,pm kisan yojana,pm kisan yojana 2021,pm kisan samman nidhi yojana,pm nidhi,pm nidhi yojana,kisan scheme,pradhan mantri kisan sanman nidhi

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सरसकट सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची अद्ययावत माहिती योग्य ती खातरजमा करून पी. एम. किसान पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सविस्तर सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून गावपातळीवर पात्र शेतकरी कुटुंबाचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करून तलाठी,ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांनी परिशिष्ट-अ प्रमाणे पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सरसकट सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांना पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची अद्ययावत माहिती योग्य ती खातरजमा करून पी. एम. किसान पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सविस्तर सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून गावपातळीवर पात्र शेतकरी कुटुंबाचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करून तलाठी,ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांनी परिशिष्ट-अ प्रमाणे पात्र शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे.

यामध्ये शेतकऱ्याचे नाव, लिंग, प्रवर्ग, आधार क्रमांक किंवा ओळखपत्राचा क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल नंबर, जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती आणि आधार क्रमांक वापरणे संबंधी सहमती / स्वयं घोषणापत्र द्यावयाचे आहे.अशा प्रकारे सर्व पात्र लाभार्थी याद्या अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाच्या पी एम किसान पोर्टलवर अपलोड केल्या आहेत.

तसेच काही पात्र लाभार्थी नोंदणी न झाल्यामुळे या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत PM-KISAN Portal वर शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी Farmer Corner या Tab मधून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर सुविधेअंतर्गत शेतकऱ्यांना CSC केंद्रावर किंवा स्वतः योग्य त्या कागदपत्रां आधारे नोंदणी करावयाची आहे.

पी. एम. किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर NIC स्तरावर (लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक, IFSC क्रमांक व इतर सर्वसाधारण माहिती, भरलेली असल्याची खात्रीकरुन) डाटा तपासून त्यानंतर तो डाटा PFMS प्रणालीवर (लाभार्थ्याचे बँकेतील नाव व खातेसंबधी भरलेली माहिती उदा.नाव व IFSC क्रमांक याबाबत प्रणालीवर आवश्यक पडताळणी केली जाते.) पुन: तपासला जातो. या दोन्ही स्तरावरून अमान्य झालेला डाटा दुरुस्तीसाठी पुन्हा District Login ला उपलब्ध करून दिला जातो.

तो डाटा जिल्हास्तरावर दुरुस्त केल्यानंतर पोर्टलवरून NIC व PFMS प्रणालीवर पुनच: तपासला जाऊन त्यानंतर या दोन्ही स्तरावरून मान्य झालेला डाटा NIC दिल्लीकडून लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बॅचेस च्या स्वरूपात पोर्टलवर District Login ला अंतिम पडताळणी करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो.

जिल्हास्तरावर सदर उपलब्ध झालेल्या डाटाची अंतिम पडताळणी केल्यानंतर लाभार्थ्यांचे नाव, बँक खाते नंबर, IFSC क्रमांक इ. विसंगती तसेच PFMS मधील काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचप्रमाणे लाभार्थी मयत असणे, जमीन खरेदी-विक्री व इतर कारणांमुळे लाभार्थी अपात्र ठरत असल्यास त्या लाभार्थ्यांचे Payment Stop करण्यासाठी Beneficiary ID> जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर- पाठविण्यात येतात. राज्यस्तरावर Payment Stop करण्यासाठी प्राप्त की, झालेले Beneficiary ID एम. किसान पोर्टलवर Upload केल्यानंतर त्याची लाभार्थ्यांचे Payment Stop केले जाते. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना Payment Release करण्यासाठी राज्यस्तरावरून RFT स्वाक्षरी करुन PM KISAN पोर्टलवर अपलोड केले जाते.

यानंतर केंद्र शासनाकडून सदर RFT ला अनुसरून FTO Generate केला जातो. सदर Generate  केलेल्या FTO मधील लाभार्थ्यांना Payment Release केले जाते.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत दि. ०१ डिसेंबर २०१९ नंतर पात्र लाभार्थ्यास वितरित करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक आधारीत करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरन करण्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहे.

💁

 असेच अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘श्री मल्टिसर्व्हिसेस ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/I6uuXLGWRznLRKmwNurOYZ